१९६६ – इयत्ता ९ वी मध्ये शिकत असताना शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.- १९६८ – शिवसेना गटप्रमुख म्हणून नियुक्ती. निवडणूक प्रचारात सहभाग, शिवसेनेच्या विविध आंदोलनांमध्ये भाग
- १९६९ – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात सहभाग(सीमा आंदोलन).
- १९७७ – जनता पक्षाच्या उदयादरम्यान, अनेक पक्ष कार्यकर्त्यांनी शिवसेना सोडली. शिवसेनाप्रमुखांवर गाढ विश्वास ठेवून पक्षात सक्रिय राहिले.
- १९८४ – एमटीएनएलमध्ये स्थानिय लोकाधिकार समिती (SLS) ची स्थापना. आंदोलनात भाग घेतला आणि एमटीएनएल व्यवस्थापनाला ३५० स्थानिक उमेदवार (भूमी पुत्र) कनिष्ठ अभियंता म्हणून निवडण्यास भाग पाडले.
- १९८५ – शिवडी परिसरातील बीएमसी निवडणुकीत यश मिळवण्यात मौल्यवान सहभाग
- १९८५ – शिवसेना पंढरपूर तालुका संपर्क प्रमुख (समन्वयक)
- १९८६ – पंढरपूर लोकसभा मतदारसंघासाठी संपर्क प्रमुख (समन्वयक)
- १९८८ – एमटीएनएलमध्ये “महानगर टेलिफोन निगम कामगार संघ” या नावाने युनियन स्थापन. १५००० हजारांहून अधिक कर्मचारी युनियनचे सदस्य. तेव्हापासून सलग ५ द्वैवार्षिक निवडणुकीत विजय.
- १९८८ – पुणे येथे झालेल्या शिवसेना राष्ट्रीय परिषदेदरम्यान प्रचार समितीत यशस्वीरित्या भाग घेतला.
- १९८८ – वंदनीय शिवसेनप्रमुख यांनी १९८८ मध्ये स्थापन केलेल्या एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एसटीचा प्रवास करून महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये एसटी कामगार सेना स्थापन केली.
- १९९२-९३ – जळगाव संपर्क प्रमुख (समन्वयक) म्हणून नियुक्ती. ४ विधानसभा जागा निवडून आणण्यासाठी कठोर परिश्रम
- १९९४ – श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांच्या प्रेरणेने, नाशिक येथे झालेल्या शिवसेना राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात पूर्ण ताकदीने काम केले. त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक माननीय शिवसेनाप्रमुखांनी केले आणि त्यांना सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
- १९९५ – तत्कालीन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख (समन्वयक) म्हणून नियुक्ती.
- धुळे येथे प्रथमच महानगरपालिका निवडणूक जिंकली आणि सिंदखेडा विधानसभा मतदारसंघही जिंकला. संपर्क प्रमुख असताना नाशिक जिल्ह्यात प्रथमच शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले.
- १९९६ – वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिफारशीमुळे विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार पद नामांकन
- १९९६ – शिवसेनप्रमुखांच्या कृपेने शिवसेना उपनेते म्हणून नियुक्ती.
- १९९६ – महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट वक्ते म्हणून निवड आणि तत्कालीन राज्यपाल श्री. पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडून राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा पुरस्कार प्रदान. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव.
- १९९८ – सरचिटणीसपदाच्या काळात राज्य परिवहन कामगारांसाठी उत्तम वेतन करार
- २००१ – आमदार परिषदेचा पहिला कार्यकाळ पूर्ण, नंतर देखील पक्षकार्यात सक्रिय
- २००४ – दुसऱ्यांदा विधान परिषदेत आमदार
- २००५ – पुणे आणि नगर जिल्ह्यांची जबाबदारी. महानगरपालिका निवडणूकीत विजयश्री
- २००५ – डॉ. विजया वाड – अध्यक्ष मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी “गुजगोष्टी” नावाचे स्वतःचे लिहिलेले पुस्तक समर्पित केले.
- २००७ – पुणे महानगरपालिका निवडणूक. राजकीय विश्लेषकांनी मर्यादित यशाचा अंदाज व्यक्त केला होता, जास्तीत जास्त १० नगरसेवक. वरिष्ठ नेत्यांच्या अनुपस्थितीत २१ नगरसेवक निवडून आले. श्री. उद्धवजींच्या संमतीने आणि मार्गदर्शनाने, पुणे पॅटर्नची स्थापना झाली, ज्यामुळे उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष पदे शिवसेनेकडे आली.
- २००८ – पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच, नामांकित सदस्य डॉ. पूजा यादव निवडून येण्यात यशस्वी.
- २००९ – पुणे व्यतिरिक्त, नगर, नाशिक जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली. कठोर परिश्रम आणि चांगल्या समन्वयामुळे, पूर्वीच्या १ ऐवजी २ खासदार निवडून आले. कार्यकाळात नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच खासदार निवडून आले.
- २०१० – पुन्हा नाशिक संपर्क प्रमुख (समन्वयक) जबाबदारी सोपवण्यात आली.
- २०११ – नांदेड, हिंगोली संपर्क प्रमुख (समन्वयक) यांची जबाबदारी सोपवण्यात आली. हिंगोली पोटनिवडणुकीत ३ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले. कल्याण डोंबिवली नगरपरिषद निवडणुकीत पूर्ण सहभाग. शिवसेना पक्षाला सत्तेत आणण्यात यशस्वी.
- २०१२ – नाशिक महानगरपालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आणि ती यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
- २०१४ – मे २०१४ मध्ये मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
- २०१९ – मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा खासदार म्हणून निवडून आले.
- २०१९ – केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री, भारत सरकार
- २०१९ – नोव्हेंबर : मंत्रीपदाचा राजीनामा
- २०२१ – भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
- २०२२ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतेपदी नियुक्ती
- २०२४ – मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून पुन्हा निवडून आले.
- २०२४ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभेचे गटनेते म्हणून नियुक्ती.