“Pride of India – Icon 2024” award by well-known Global News organization Herald Global (20th August, 2024)
प्राईड ऑफ इंडिया आयकॉन – जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार
हिंदुस्थानसाठी अभिमानास्पद कामगिरी तसेच दूरदर्शी नेतृत्वाची दखल घेऊन जागतिक पातळीवरील ‘हेराल्ड ग्लोबल अॅण्ड ईआरटीसी मीडिया’द्वारे दिल्या जाणाऱया प्रतिष्ठेच्या ‘प्राईड ऑफ इंडिया आयकॉन 2024’ या पुरस्कारासाठी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांची निवड झाली. मुंबईत आयटीसी मराठा येथे आयोजित ‘गोलफेस्ट कॉन्क्लेव्ह 2024’ सोहळ्यात अरविंद सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिंदुस्थानच्या अभिमानाला मूर्त रूप देणार्या प्रतिष्ठित नेत्यांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. देशाला अभिमानास्पद कामगिरी, कर्तव्यासाठी वचनबद्धता, देशाच्या समृद्ध वारसाचे प्रतिबिंब आणि अर्थव्यवस्थेवरील परिवर्तनात्मक प्रभाव अशा क्षेत्रांतील विविध कामगिरीची दखल घेऊन खासदार अरविंद सावंत यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
UNICEF India ‘Parliamentarians’ Group for Children’ (PGC) award
‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हा पुरस्कार अरविंद सावंत यांना भारतातील लहान मुलांचे जीवन सुधारण्यासठी महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल देण्यात आला. अरविंद सावंत यांना लोकसभेत ‘शिक्षणाचा हक्क’, ‘मुलांवरील अत्याचारांपासुन त्यांची सुरक्षा’ ‘कुपोषण आणि बाल आरोग्य’ या संदर्भात चर्चासत्रातील त्यांचा उल्लेखनीय सहभाग आणि लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न, या सर्वांचा विचार करून २०१८-१९ वर्षासाठी उपरोक्त पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
- Topper in India (16th Loksabha tenure) for Attendance and Raising Issues / Questions of Common man concern in Parliament sessions
२०१४–२०१९ कालावधीत लोकसभा सत्रात हजर राहण्यात, मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न विचारण्यात, लोकहिताच्या चर्चेत सहभागी होण्यात अख्ख्या देशात सर्वोच्च स्थान
- “Fame India Shreshth Saansad” Award 2018 – Fame India
‘फेम इंडिया’ द्वारे २५ प्रवर्गांमध्ये सर्वश्रेष्ठ प्रतिभा दाखविणाऱ्या कर्मयोद्धा खासदारांची निवड करण्यासाठी केल्या गेलेल्या सर्वेक्षणात ‘जज्बा’ प्रवर्गात देशातील सर्वोत्कृष्ट खासदार
- “Mumbai Bhushan” Puraskar 2017 by Jeevanadhar Foundation for remarkable performance in political and social activities.
मुंबै भुषण 2017 (जीवनाधार फाउंडेशनद्वारे)
- “Best Union Leader” Newsmakers Achievers Award 2016
अख्ख्या देशातील ‘सर्वोत्कृष्ट युनियन लीडर’ ॲवॉर्ड न्यूजमेकर्स अचिव्हर्स द्वारे
- “
Best Orator in Maharashtra Legislative Council” – Adjudged as the Best Orator in Maharashtra Legislative Council and conferred the award of Commonwealth Parliamentary Board in 1996 by the then Governor of Maharashtra Shri P.C. Alexander.
“महाराष्ट्र विधान परिषदेतील सर्वोत्कृष्ट वक्ता” विधानपरिषद आमदारकीच्या कार्यकाळात 1996 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडुन गौरव