मुंबईतील १५००० जुन्या मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा…

#कार्य_शिवसेनेचे

आदरणीय उद्धवजी खऱ्या अर्थाने गोरगरीबांचे कुटुंबप्रमुख आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मुंबईतील चाळकऱ्यांच्या वतीने त्यांना लाख लाख धन्यवाद आणि महामहिम राष्ट्रपती श्रीमती मुर्मु यांना मनापासून धन्यवाद आणि आभार!!!
मुंबईतील १५००० जुन्या मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा…
आदरणीय तत्कालिन मुख्यमंत्री शिवसेना पक्षपमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईतील १५००० उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाचे विधेयक २०२० मध्ये महाराष्ट्र विधानसभेने आणि विधानपरिषदेने मंजुर केले. यासाठी आमदार श्री. अजय चौधरी यांनी अथक प्रयत्न केले. तद्नंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठविण्यात आले व त्यावर स्वाक्षरी होत नव्हती म्हणून खासदार श्री. अरविंद सावंत यांनी महामहिम राष्ट्रपतींकडे पाठपुरावा केला तसेच राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. लाखो मुंबईकरांचा विचार करून राष्ट्रपतींनी त्यावर लवकरात लवकर स्वाक्षरी करावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठपुरावा करण्याबरोबरच आक्रोश आंदोलनही केले होते.
अखेर आता महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी उपरोक्त विधेयकावर स्वाक्षरी केली आणि उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला.