“आपला माणूस” म्हणून ख्याती असणारे शिवसेना खासदार अरविद सावंत यांचा स्वभाव लोकांमध्ये मिसळणारा व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि त्यांच्यातीलच एक असल्यामुळे लोकांच्या त्यांच्याकडुन साहजिकच अपेक्षा खुप आहेत.

लोकसभेच्या अधिवेशनात जवळजवळ 100% उपस्थिती राखुन त्यांनी मुंबई, महाराष्ट्र व देशपातळीवरील अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. तसेच सातत्याने विविध स्तरांवरती पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला आहे.

प्रामुख्याने मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळवुन देणेबाबत, मुंबईमधील चाळींना दिलेल्या पक्क्या घराचा वायदा, कोस्टल रोड, मुंबईचा पूर्व किनारा, क्लस्टर डेव्हलपमेंट, मुंबईमधील ट्रॅफिक जाम ची समस्या, शेतकरी आत्महत्या, भूमी अधिग्रहण कायदा, जीएसटी मधील आक्षेपार्ह मुद्दे व व्यापार्‍यांच्या समस्या, क्लायमेट चेन्जमुळे संभावित समस्या, बीडीडी चाळीचा विकास – विशेषत: शिवडी येथील बीडीडी चाळीची समस्या, हॅन्कॉक ब्रिजची समस्या, मध्य व पश्चिम रेल्वेसंबंधिचे विविध प्रश्न, रेल्वेच्या प्रवाशांच्या सुखसोयींसाठी अनेक उपाय, रेल्वेमधील महिलांची सुरक्षा, महिलांना रेल्वेमध्ये इ-टॉयलेट सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत, रेल्वे स्थानकांचे ब्रिटीशकालीन नावे बदलणे, पाकिस्तानसोबत सर्व देवाण-घेवाण बंद करण्यासंदर्भात, बेळगाव – कारवार – खानापूर – निपाणी – बिदर – भालकी सह संयुक्त महाराष्ट्र होण्यासंदर्भात, एमएमआरडीएने प्रसिद्ध केलेल्या मुंबई महानगर क्षेत्रीय प्राधिकरणाच्या २०१६-२०३६ आराखड्याच्या मसुद्याच्या अनुचित प्रक्रियेसंदर्भात, शिवडी किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वास्तुंच्यासंदर्भात, शापुरजी पालनजी कॉलनी (परेल) येथील इंडियन कॅन्सर सोसायटी व टाटा मेमोरियल हॉस्पियांच्या मालकीच्या जमिनीवर स्थित झोपडपट्टी रहिवाशांच्या पुनर्वसन समस्येसंदर्भात, पानिपत येथील रोड मराठा कम्युनिटीसंदर्भात, मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी निधी, महानगर टेलिफोन निगमच्या तांत्रिक अडचणी, करी रोडचा पूल अशा एक ना अनेक विषयांवरील अभ्यासपूर्ण भाषणांनी व चर्चेतील सहभागाने शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेची, मुंबईकरांची, महाराष्ट्राची व देशवासीयांची भावना लोकसभेत मांडली आहे.

विविध केंद्रीय समित्यांमध्ये केवळ हजेरी न लावता प्रत्येक प्रश्नावर परखड मत मांडुन , योग्य त्या सूचना केल्या आहेत व त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करुन लक्षणीय योगदान दिले आहे.

स्थानिक खासदार विकासनिधीद्वारे प्रियदर्शनी पार्कचे सुशोभिकरण व शिशुउद्यान (नेपियन सी रोड) , चंडिका संस्थान (शिवडी) येथे पंप रुम बसवुन दीर्घकाळ प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, पोद्दार हॉस्पीटल येथे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आसनव्यवस्था, बाणगंगा येथे व्यायामशाळा, ज्युलिएट हाऊस येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा, हुतात्मा सिताराम वानाजी पवार स्मारक, अनेक ठिकाणी जलजोडणी, सार्वजनिक शौचालये, लादीकरण, समाजमंदीरे, व्यायामशाळा, संरक्षक भिंत (प्रोटेक्शन वॉल), आसनव्यवस्था व सुशोभीकरण, डांबरीकरण सारखी अनेक विकासकामे संपन्न झाली आहेत / प्रस्तावित आहेत.

खासदार अरविंद सावंत यांच्या संकेस्थळावर तसेच त्यांच्या युट्युब चॅनेलवर चलचित्र स्वरुपात व समाजमाध्यमावरती त्यांच्या खासदारकीच्या कारकीर्दीचे सर्व अपडेट्स उपलब्ध आहेत. स्वत: समाजमाध्यमांवरती सक्रिय राहुन लोकांनी दिलेल्या सूचनांची ते दखल घेतात हे वैशिष्ट्य!

2016 साली त्यांना ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले तर 2017 साली ‘मुंबै भूषण’ पारितोषिकाने….

‘फेम इंडिया’ द्वारे देशभरात भिन्न 25 प्रवर्गांमध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणात श्री. अरविद सावंत यांची ‘जज्बा’ प्रवर्गात देशातील सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून जनसंपर्क, प्रभाव, प्रतिमा, स्वत:ची ओळख, कार्यशैली, लोकसभा अधिवेशनातील उपस्थिती, चर्चांमधील सहभाग, सभागृहात प्रश्न उपस्थिती, खासदार निधी विनियोग, सामाजिक सहभाग अशा विविध मुख्य मापदंडांच्या निकषांवरती निवड करण्यात आली. ’फेम इंडिया श्रेष्ठ सांसद अवॉर्ड २०१८’ या कार्यक्रमात माननीय केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन व माननीय केंद्रीय मंत्री श्री. हरी भाई चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

जनतेच्या सूचना / तक्रारी / संदेश स्वागतार्ह आहेत.- ‘संपर्क दुवा’

जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम्‌!