शिवसेनेच्या अथक पाठपुराव्यास यश… एनटीसी मिलच्या भुखंडावरील 11 चाळींचा अखेर पुनर्विकास होणार

#कार्य_शिवसेनेचे

शिवसेना नेते, प्रवक्ते – खासदार श्री. अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांना दिल्लीत कायम वाचा फोडली आहे, तसेच सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन त्यास यश प्राप्त करुन घेतले आहे. याच प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे एनटीसी मिल्सच्या 11 भुखंडावरील चाळींच्या पुनर्विकासास अखेर मिळालेली गती.

एनटीसी मिलच्या जागेवरील चाळींसंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुराव्यातील काही महत्त्वपूर्ण पडाव :

  • मे २०१५ : एनटीसी चेअरमन श्री. वैश्य यांच्यासोबत बैठक
  • जुलै २०१५ : केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री. संतोष गंगवार यांना पत्र
  • जुलै २०१६ : लोकसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित
  • जुलै २०१६ : केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री. अजय तामटा यांना पत्र
  • ऑगस्ट २०१६ : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री सौ. स्मृती इराणी यांना निवेदन
  • मार्च २०१८ : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री सौ. स्मृती इराणी यांना पत्र
  • एप्रिल २०१८ : आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांना पत्र
  • जानेवारी २०१९ : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री सौ. स्मृती इराणी, वस्त्रोद्योग खाते सचिव, एनटीसी अध्यक्ष यांना निवेदन व चर्चा
  • सप्टेंबर २०२० : लोकसभेत एनटीसी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी सरकारने धोरण तसेच कायदा बनवण्याची मागणी
  • ऑक्टोबर २०२० : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री. पियुष गोयल यांना पत्र
  • नोव्हेंबर २०२० : एनटीसी मिल वसाहतींच्या दीर्घकाळ प्रलंबित पुनर्विकासासंदर्भात म्हाडा अध्यक्ष श्री. विनोद घोसाळकर व सबंधित अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
  • फेब्रुवारी २०२२ : लोकसभेत एनटीसी मिल्सचा प्रश्न उपस्थित
  • एप्रिल २०२२ : आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांना स्मरणपत्राद्वारे पाठपुरावा
  • डिसेंबर २०२२ : लोकसभेत एनटीसी मिल्सचा प्रश्न उपस्थित