शिवसेनेची वचनपूर्ती, कोस्टल रोडचे स्वप्न पूर्ण… कामास सुरुवात!

“कोस्टल रोड हे माझे स्वप्न नसून, मुंबईकरांचे आहे. त्यामुळे याचे सर्व श्रेय मुंबईकरांनाच जाते” –
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा ‘ड्रिम प्रॉजेक्ट’, मुंबईकरांसाठी कोस्टल रोड संदर्भात केंद्रसरकारकडून आवश्यक त्या प्रशासकीय परवानग्या जलद प्राप्त करण्यासाठी लोकसभेत मागणी, संसदेच्या आवारात आंदोलन, स्थानिक कोळी बांधवांसोबत बैठका…

शिवडी बीडीडी चाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन शिवडीतच… प्रयत्नांना यश!

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असलेल्या शिवडी बीडीडी चाळीत ९६० निवासी गाळे आहेत, वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे उद्घाटन झाले परंतु शिवडी बीडीडी चाळीची जागा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत असल्यामुळे केंद्रसरकारच याबाबतीत निर्णय घेऊ शकते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री श्री. नितीन गडकरी यांच्याकडे तसेच संबंधित यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करुन तसेच वारंवार लोकसभेत सदर प्रश्न उपस्थित करुन, माननीय पंतप्रधान मोदीजींना देखील यात लक्ष घालण्याची विनंती करुन समस्येचे निराकरण केले.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर स्थीत झोपडपट्टीतील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे शिवसेना!

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विविध जागेवर स्थित झोपड्यांच्या प्रलंबित समस्येच्या संदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. तत्समयी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी ‘राज्यशासनाच्या धोरणानुसार या झोपड्यांचे पुनर्वसन केले जाईल, तोपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही’, असे आश्वासन दिले.
कुलाबा येथील झोपड्यांच्या समस्येबद्दल भेटून निवेदन सादर करुन तेथील नागरिकांना न्याय मिळवुन दिला.
कोळसा बंदर, शिवडी, येथील संभाव्य कारवाईची कल्पना येताच स्वत: जातीने लक्ष घालून रहिवाशांसोबत ठामपणे उभे राहुन मुंबई पोर्ट ट्रस्ट उपाध्यक्ष श्री. यशोधन वनगे यांच्यासमवेत तातडीने बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली व तेथील झोपड्यांचे पुरावे सादर केले आणि हे पुरावे असतानाही ज्यानी कारवाई केली त्यांनी पुन्हा झोपड्या पूर्ववत बांधुन द्याव्यात तसेच यापुढे कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय कारवाई करू नये अशी आग्रही मागणी केली. श्री. वनगे यांनी त्यास मान्यता दिली. तसेच यापुढे झोपड्यांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांना रीतसर नोटीस देण्यात येईल, तत्पश्चात अधिकृतपणा सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची पूर्ण संधी दिली जाईल असे स्पष्ट आश्वासन सदर बैठकीत दिले.

शापुरजी पालनजी कॉलनीमधील रहिवाशांच्या पाठीशी ठामपणे उभा

शापुरजी पालनजी कॉलनी (परेल) येथील इंडियन कॅन्सर सोसायटी व टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या मालकीच्या भूखंडावरील झोपडपट्टीमधील रहिवाशांना भेडसावणार्‍या पुनर्वसनाच्या समस्येची गंभीर नोंद घेऊन सदर बाबीसंदर्भातदिल्ली येथे माननीय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. जगत प्रकाश नड्डा व माननीय केंद्रीय परमाणु ऊर्जा व अंतरिक्ष राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची वैयक्तिक भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली तसेच यासंदर्भात पत्र देखील दिले. सदर समस्येचा पाठपुरावा करताना टाटा मेमोरियल रुग्णालय व ॲटोमिक एनर्जी चेअरमन डॉ. शेखर बासु व झोपडी सेवा संघ पदाधिकारी यांच्यासमवेत देखील बैठकी घेऊन सातत्याने सर्व स्तरांवर पाठपुरावा..

सँडहर्स्ट रोड येथील संरक्षक भिंत पडल्यावर त्वरित प्रयत्न करुन भिंत उभारणी

सँडहर्स्ट रोडला लागुन असलेली संरक्षक भिंत कोसळली तेंव्हा रेल्वेच्या अधिकार्‍यांनी भिंतीलगतच्या इमारती खाली न केल्यास ही संरक्षक भिंत बांधता येणार नाही अशी भूमिका घेतली. मी रेल्वे,म्हाडा व महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांशी एकत्रितपणे चर्चा करून पालकमंत्री श्री. सुभाष देसाई यांना ही परिस्थिती कथन करताच त्यांनी घटनास्थळी व्यक्तिश: भेट दिली आणि लोकांची अडचण लक्षात घेऊन जर रेल्वे काम करु शकत नसेल तर मी मुंबई पालकमंत्री या नात्याने ही भिंत बांधुन देण्याची जबाबदारी घेतो असे सांगितले. सदर संरक्षक भिंतीसाठी पालकमंत्री श्री. सुभाष देसाई यांनी जिल्हा नियोजन विकास महामंडळ निधीतून (District Planning Development Corporation (DPDC) funds)रु. दीड कोटीचा निधी वितरित केला आहे. या भिंतीमुळे लगतच्या घरांमध्ये राहणारी सर्व मराठी कुटुंबे निर्भय झाली आहेत कारण घरे खाली न करता या संरक्षक भिंतीचे काम आयआयटीच्या इंजिनियर्सच्या मार्गदर्शनानुसार म्हाडाच्या माध्यमातून केले जात आहे.

जाम मिल मधील गाळेधारकांना मिळवुन दिला न्याय…

जाम मिल ईमारतीमध्ये ५० वर्षांपासुन असणाऱ्या दुकानदारांना एनटीसी मार्फत गाळे रिक्त करण्यासाठी आलेल्या सूचनेसंदर्भात मा. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्यासमवेत तसेच वस्त्रोद्योग सचिव श्री. अनील सिंग, NTCचे प्रमुख व्यवस्थापक श्री. श्रीनिवासन यांच्यासमवेत सातत्याने चर्चा करुन अखेर समस्येचे निराकरण करुन दिले. गाळेधारक व त्यांच्या कुटुंबियांनी सत्कार आयोजित करुन कृतज्ञता व्यक्त केली.