- हँकॉक पुलाचे बांधकाम सुरु न झाल्यामुळे सॅंडहर्स्ट रोड परिसरात राहणार्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्यामुळे सदर पूल प्राधान्याने सुरू करणेबाबत, तसेच सदर पूल बांधताना सॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकातील (मध्य रेल्वे) प्लॅटफॉर्म क्र. 1 व 2 वर जाण्यासाठी नवीन पादचारी पूल बांधणेबाबत
- मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलणेबाबत – ‘एल्फिन्स्टन रोड’चे नामकरण ‘प्रभादेवी’; ‘चर्नीरोड’ रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘गिरगाव’; ‘करी रोड’ रेल्वेस्थानकाचे नाव ‘लालबाग’, ‘सँडहर्स्ट रोड’ रेल्वेस्थानकाचे नाव ‘डोंगरी’; ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ रेल्वेस्थानकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ तसेच ‘छत्रपती शिवाजी एअरपोर्ट’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट’ असे करण्यात यावे; ‘मुंबई सेंट्रल’ रेल्वे स्थानकास मुंबईच्या विकासाचे शिल्पकार ‘नाना शंकरशेट’ यांचे नाव देणेबाबत सातत्याने पाठपुरावा
- परळ – भायखळा पूल व जे.जे. फ्लायओव्हरवरील वाहनांच्या रहदारीमुळे फ्लायओव्हरला समांतर घरांमधील नागरिकांना आवाजाचा होणारा त्रास ध्यानात घेऊन परळ – भायखळा पूल व जे. जे. फ्लायओव्हरवर ध्वनीरोधक पडदे बसविणेबाबत
- प्लॅस्टीकमुळे होणार्या प्रदुषणास आळा घालण्याच्या उद्दीष्टाने विविध महाविद्यालयांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी SBM Reverse Vending Machines (PET bottle recycling machines) बसविणेबाबत
- गणपती मूर्तिकारांना गणेशोत्सवपूर्व काळात मुर्त्या बनविण्यासाठी भेडसावणार्या जागेच्या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्दीष्टाने इंडिया युनायटेड मिल, लालबाग येथे त्यांना जागा मिळण्याबाबत
- बीडीडी चाळी व एमबीपीटीच्या जमिनीवरील चाळींचा पुनर्विकासासंदर्भात
- भाडेतत्वावर विविध इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या मागण्या संदर्भात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा
- गिरणी कामगार रहिवाशी संघ यांच्या रहिवाशांच्या मागण्यांसंदर्भात सर्व स्तरांवर सातत्याने पाठपुरावा
- दक्षिण मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्था व चाळींतील रहिवाशांच्या विविध समस्यांचे म्हाडा, पालिका, महाराष्ट्र सरकार इत्यादींमार्फत निराकरण करणेबाबत
- महानगर टेलिफोन निगम लिमिटेड च्या पुनरुत्थानासाठी प्रयत्नशील, विविध केंद्रीय मंत्र्यांशी व विभागांशी पत्रव्यवहार.
- सीफेरर्स – फॉरवर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडिया यांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा
- माझगाव डॉक येथील युटिलिटी कामगार म्हणून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना माझगाव डॉक मध्ये कायमस्वरूपी तत्वावर घेण्यासाठी पाठपुरावा
- फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार व पाठपुरावा
- मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, कोची या संस्थेमध्ये मुंबई रिसर्च सेंटर, वर्सोवा या मुंबईतील एकमेव संस्थेचे विलीनीकरण न करण्याबाबत
- एस. टी. कामगार संघटनेमार्फत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा
- शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे, तालुका : कणकवली, जिल्हा : सिंधुदुर्ग शाळेस 20 टक्के तुकडी अनुदान सुरु करणेबाबत
- मौजे – कुंभवडे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग या गावातील तसेच येथील पंचक्रोशीतील गावकर्यांना असणारी पाण्याच्या दुर्भीक्षाची समस्या ध्यानात घेऊन लघु-मध्यम प्रलंबित पाटबंधारे प्रकल्प मंजूर करणेबाबत
- कमला मिल कम्पाऊंड मधील ‘1अबॉव’ आणि ‘मोझो’ या रेस्टोपबना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या गिरण्यांच्या जमीनीवर उभ्या असलेल्या व्यावसायिक वा निवासी संकुलांची न्यायालयीन चौकशी करणेबाबत
- जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या “शिवनेरी” किल्ल्याची दुर्दशा, शिवाई मंदिराला गळती आणि स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेकडे लक्ष पुरवून आवश्यक उपाययोजना करणेबाबत
- दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळील ‘बॉम्बे हॉस्पीटल लेन’ या रस्त्याला ‘पद्मश्री कै. नाना चूडासामा’ यांचे नाव देणेबाबत
- कमकुवत असल्यामुळे महापालिकेने तोडलेला चर्नीरोड रेल्वेस्थानकास समांतर असलेल्या पुलाची पुनर्बांधणी करणेबाबत
- रेल्वे स्थानकांवर SBM Reverse Vending मशिन्स बसविणे; रेल्वे स्थानकांवर आसनव्यवस्था बेंचेस बसविणे; रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे इ. पायाभूत सुविधा देणे; लोकांना बसण्यासाठी बेंचेस बसविणे, ‘वन रुपी क्लिनिक’ सुरु करणे, महिलांच्या डब्यांमध्ये शौचालये बसविणे; डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर सरकते जिने बसविणेबाबत