विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सर्वसामान्यांच्या विषयांवर शिवसेनेचा बुलंद आवाज
- हिंदुस्थान – पाकिस्तान समस्या व त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसोबत सर्व संबंध तोडण्याची मागणी
- कश्मीरप्रश्न, कलम 370 रद्द करुन समान नागरी कायदा अंमलबजावणीची मागणी
- दहशतवाद पसरवण्यासाठी पैसा पुरविल्याप्रकरणी वादग्रस्त धर्मप्रसारक डॉ. झाकिर नाईकवर बंदी घालण्याची निडर मागणी देशात सर्वप्रथम केली व सदर मागणी मान्य होईपर्यंत पाठपुरावा केला.
- तिहेरी तलाक कायदासंदर्भात सुधारणा सुचविल्या, कश्मीरमधे देखील हा कायदा लागू करण्याची मागणी
- रोहिंग्या रेफ्युजी व त्या पार्श्वभूमीवर सीमेवरील सुरक्षा
- संविधानातील विविध कलमांच्या अंमलबजावणी संदर्भात सूचना
- ॲट्रॉसिटी विधेयकाबद्दल प्रभावी अभ्यासपूर्ण भाषण, अंमलबजावणी संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
- भ्रष्टाचार निवारण विधेयकावर महत्त्वपूर्ण सूचना
- उत्तर पूर्व सीमेकडील सुरक्षेसंदर्भात सूचना
- मुंबईकडुन देण्यात येणाऱ्या करावर आधारित मुंबईसाठी अतिरिक्त विकास निधीची मागणी
- वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर पॅरीस ॲग्रीमेन्ट कडे लक्ष वेधले; क्लायमेट चेन्ज (वातावरण बदल) संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी
- मराठा, धनगर, जाट, पटेल, वर्तिधर, कोळी इत्यादी सर्वांच्या आरक्षणाचा मुद्दा एकदाच तडीस नेण्याची मागणी
- मोफत व अनिवार्य बाल शिक्षण अधिकार संदर्भातील त्रुटी व सुधारणा; ‘शिक्षणाचा अधिकार’ नव्हे तर ‘दर्जेदार शिक्षणाचा अधिकार’ मिळवून देण्यासाठी मागणी; जागतिक दर्जाचे शिक्षण सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे या उद्दीष्टाने विविध बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निवडक विषयांसाठी समान अभ्यासक्रमाची सातत्यपूर्ण मागणी; सर्व शिक्षा अभियानात अभ्यासपूर्ण सूचना
- शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची, त्यांचा सात-बारा एकदाच कोरा करण्याची मागणी
- शेतकऱ्यांच्या विविध समस्या सातत्याने लोकसभेत मांडल्या; भूमी अधिग्रहण कायद्याचे दुष्परिणाम व शेतकर्यांच्या दृष्टीने परिणामकारक, अभ्यासपूर्ण सूचना;
- शेतकऱ्यांना शेतमालासाठी न्यूनतम मुल्य निर्धारण व निश्चितीची मागणी
- रेल्वेच्या पूलांच्या पुनर्बांधणी संदर्भात सातत्याने मागणी व पाठपुरावा, दक्षिण मुंबईमधील अनेक पूल आपल्या कार्यकाळात पुनर्बांधणी करण्यात आले.
- महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नात केंद्र सरकारने लक्ष घालण्याची मागणी
- भूमीपुत्रांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी
- मराठी भाषेस ‘अभिजात भाषेचा’दर्जा मिळवुन देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
- रेल्वे अपघात व त्या संदर्भात उपाय योजना, ड्रोन सारख्या सुविधांची मागणी
- रेल्वेच्या वेळापत्रकामधील अनियमितता व त्यासंदर्भातील सुधारणा, उन्नत रेल्वे मार्गाची (एलिव्हेटेड ट्रेन्स) ची मागणी
- रेल्वे स्थानकांवर दर्जेदार सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी व स्वत:च्या खासदार निधीद्वारे अनेक रेल्वे स्थानकांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध; दक्षीण मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर आसनव्यवस्था (Steel Benches) खासदार निधीद्वारे उपलब्ध करुन दिली.
- रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्यासाठी यशस्वी प्रयत्न
- जुन्या मोडकळीस आलेल्या ईमारतींच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
- शिवडी येथील बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या समस्येकडे लक्ष पुरविण्याची सातत्याने मागणी, मा. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी ते थेट माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यापर्यत समस्या निराकरणाची मागणी केली. बीडीडी चाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन शिवडीतच करण्याचा निर्णय मान्य करुन घेतला.
- मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर स्थीत रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण
- एनटीसी मिलच्या जागेवर स्थीत रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण
- शापुरजी पालनजी कॉलनी (परेल) येथील इंडियन कॅन्सर सोसायटी व टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या मालकीच्या जमिनीवर स्थीत झोपडपट्टीमधील रहिवाशांना भेडसावणारी पुनर्वसनाची समस्या
- जीएसटीमुळे विविध व्यापारी क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम अधोरेखित करुन लोकसभेत तसेच विविध खात्यांच्या मत्र्यांकडे पाठपुरावा करुन व्यापाऱ्यांना करात न्याय्य सवलत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न
- सुवर्णकारांच्या, कपडा व्यापाऱ्यांच्या, सराफांच्या, स्थानिक व्यापाऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात अग्रेसर
- विविध पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे (सार्वजनिक उपक्रमांचे) पुनर्जीवीकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न व नियोजनबद्ध उपाययोजना सुचविणे.
- जैतापुर अणु उर्जाप्रकल्पाच्या दुष्परिणामांवर लोकसभेत प्रकाशझोत टाकला.
- रेल्वे भरतीतील घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आवास योजनेतील सुधारणा
- पक्का घर योजनेत महत्त्वपूर्ण सूचना, गरीब नागरिकांसाठी आवश्यक सुधारणा
- उपनगरीय रेल्वेच्या डब्यात महिलांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी
- महिला व बाल सुरक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
- किडनी आजाराने त्रस्त रुग्णांना अपंगांकरिता रेल्वेच्या राखीव असलेल्या डब्यातुन प्रवास करण्यासाठी परवानगी
- रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण व नियोजनबद्ध उपाययोजना सुचविणे.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळचे ऐतिहासिक वैभव, महाराष्ट्रातील जुने गड-किल्ले यांचे संवर्धन इ.